Tue, Mar 19, 2019 09:16होमपेज › Pune › सॅनिटरी नॅपकीन कचर्‍याची जबाबदारी पर्यावरण मंत्रालयाने झटकली

सॅनिटरी नॅपकीन कचर्‍याची जबाबदारी पर्यावरण मंत्रालयाने झटकली

Published On: Jun 12 2018 1:46AM | Last Updated: Jun 12 2018 1:03AMपुणे ः प्रतिनिधी

स्थानिक पातळीवर महानगर पालीका व नगर परिषद राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ; तसेच सॅनिटरी नॅपकीन उत्पादक यांचीच सॅनिटरी नॅपकीन कचरा व्यवस्थापनाची जबादारी असल्याचा पवित्रा पर्यावरण मंत्रालयाने घेतला आहे़  वने-पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्रालय दिल्ली यांचे शास्त्रज्ञ रामुली अडप्पा यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र म्हणजे भारतातील सॅनिटरी नॅपकीन कचर्‍याची जबाबदारी टाळण्याचा प्रकार असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड असीम सरोदे यांनी केला. 

कायदयाच्या विद्यार्थिनी पुर्वा बोरा यांनी सॅनिटरी नॅपकीनच्या कचरा अव्यवस्थापनाबाबत दाखल केलेल्या पर्यावरणहित याचिकेत सरकारला जाग आली आणि त्यांनी त्यांचे म्हणणे 23 मेच्या प्रतिज्ञापत्राद्वारे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या रजिस्टांरकडे दाखल केले आहे़  या संदर्भातील याचिकेची सुनावणी 10 जुलै रोजी न्या. सोनु वांगडी व तज्ञ सदस्य डॉ. नगीन नंदा यांच्या समक्ष राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण पुणे येथे होईल.