Wed, Mar 20, 2019 22:59होमपेज › Pune › थर्माकोलला ‘इकोफ्रेंडली’ मखरांचा पर्याय

थर्माकोलला ‘इकोफ्रेंडली’ मखरांचा पर्याय

Published On: Sep 12 2018 3:47PM | Last Updated: Sep 12 2018 3:47PMपुणे : प्रतिनिधी

अवघ्या  काही तासातच घरोघरी गणरायाचे आगमन होणार आहे. सगळीकडेच लाडक्या बाप्पासाठीची सजावट, तयारी पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांपासून लोकांचा कल इको फ्रेंडली गणपतीची मूर्ती म्हणजेच पर्यावरणाला हानी होणार नाही अशा शाडूच्या मूर्तीला जास्त पसंती मिळताना दिसू लागली आहे. त्यातच आता बाप्पासाठी इको फ्रेंडली मखर ही सध्या चर्चेचा विषय ठरू लागला आहे.

यंदा थर्माकोलबंदीमुळे कागदांच्या, पुठ्‌ठ्यांच्या मखरांचा पर्याय उपलब्ध झाला आहे. ग्रीटींग कार्ड, लग्नपत्रिका, विविध रंगसंगतीचे कागद यांचा सुरेख वापर करत अगदी सुंदर आणि टिकणारे मखर बनविण्यात आले आहेत.हे मखर दिसायला आकर्षक, वजनाने हलके व टिकाऊ आहेत. पुठ्‌ठ्यांचे फोल्डिंग मखरही यात उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे कागदाच्या व सॅटीनच्या फुलांची आरास केलेल्या  कमानी देखील भाविकांच्या पसंतीस उतरत आहेत. हे इको फ्रेंडली मखर सामान्यांच्या खिशाला परवडणारे आहेत. पुठ्‌ठ्यांचे फोल्डिंग मखर भाविक नीट सांभाळून ठेवून पुन्हा पुढील वर्षी वापरू शकतात. त्यामुळे ग्राहकांची अशा मखरांना अधिक पसंती आहे.