Wed, Aug 21, 2019 03:12होमपेज › Pune › कचरा हस्तांतरण केंद्र हलविण्याची मागणी धूळखात 

कचरा हस्तांतरण केंद्र हलविण्याची मागणी धूळखात 

Published On: May 18 2018 1:32AM | Last Updated: May 18 2018 12:31AMमुंढवा : नितीन वाबळे

हडपसर औद्योगिक वसाहतीमधील पालिकेच्या कचरा हस्तांतरण केंद्रामध्ये शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून दररोज सुमारे पाचशे ते साडेपाचशे टन कचरा येतो. येथून तो हडपसर परिसरात असलेल्या वेगवेगळ्या कचरा प्रक्रिया केंद्रांवर तसेच उरुळी देवाची येथे पाठविला जातो. या कच-याची ने-आण करताना तसेच डंपिंग करताना त्याच्या दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. येथील कचरा हस्तांतरण केंद्र हलविण्यासाठी स्थानिकांनी अनेक वेळा आंदोलने केली आहेत, मात्र, पालिका प्रशासनाने त्याची अद्याप दखल घेतलेली नाही.

पुणे मनपा हद्दितून दररोज कंटेनर, टिपर, घंटागाड्या, टेम्पो, स्वच्छची वाहने अशा 170 हून अधिक कच-याच्या खेपा येथे होतात.  कंटनेर - 1 टन, टिपर - अडीच टन, घंडागाड्या दीड टन, टेम्पो एक हजार 200 किलो आणि स्वच्छच्या वाहनांमध्ये 300 ते 400 किलो कचरा वाहून नेण्याची क्षमता आहे. या सर्व वाहनांमध्ये दररोज ओला आणि सुका कचरा आणला जातो. नंतर पालिकेच्या बीआरसी वाहनांमधून हा कचरा उरूळी देवाची व रोकेम कचरा प्रकल्पामध्ये पाठविला जातो. मात्र, मागिल काही दिवसांपासून रोकेम बंद असल्याने येथील सर्व कचरा उरूळी देवाची येथे पाठविला जात आहे.या ठिकाणी ’अजिंक्य’ कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू होता. मात्र, काही कारणांमुळे मागील वर्षभरापुर्वी तो बंद झाला. मागील सहा महिण्यांपासून येथे ’भूमीग्रीन’ कचरा प्रकल्प सुरू आहे. या ठिकाणी दररोज दोनशे टन कच-यावर प्रक्रिया केली जाते. या ओल्या कच-यातील पाणी आणि निरुपयोगी घटक वेगळे करून सुमारे 150 टन खत तयार केले जाते.