Fri, Jul 19, 2019 07:09होमपेज › Pune › बंद पडलेल्या रोलरने उडवला थरकाप

बंद पडलेल्या रोलरने उडवला थरकाप

Published On: Mar 21 2018 2:10AM | Last Updated: Mar 21 2018 1:05AMदेहूरोड : वार्ताहर

भर उन्हाची वेळ...महामार्गावर वाहनांची रांग... आणि पुढे चढणीवर जाणारा रोडरोलर अचानक थांबला. हळूहळू मागे सरकु लागला... चालकाने मागील वाहनांना धोक्याचा इशारा दिला.. आणि नागरिकांनी प्रसंगावधान राखून रोलरच्या चाकासमोर मोठे दगड टाकले. काही कळायच्या आत हा थरार संपला आणि उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

अक्षयकुमार च्या खट्टा-मिठा चित्रपटाची आठवण जागी करणारा हा प्रसंग पुणे-मुंबई महामार्गावर बाजारपेठेजवळ स्वामी विवेकानंद चौकात घडला. सकाळी साडेअकराच्या सुमारास तळेगावच्या दिशेने जाणारा हा रोलर अचानक बंद पडला. पुढे चढण असल्याने मागे उताराच्या दिशेने सरकू लागला. चालकाने मागील वाहनांना सावध करून नागरिकांना चाकाखाली दगड टाकण्याचे आवाहन केले. नागरिकांनी तत्काळ शेजारी पुलाच्या कामासाठी पडलेले दगड चाकासमोर टाकले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. इंधन संपल्यामुळे हा प्रकार घडल्याचे चालकाने सांगितले. 

सुमारे तासाभराने सर्व सोपस्कार उरकून हे धूड हटविण्यात आले.  मात्र तोपर्यंत वाहतूक चांगलीच विस्कळीत झाली होती. ट्राफिक वार्डनला वाहतूक सुरळीत करताना बरीच कसरत 
करावी लागली.    

Tags : pune ,pune news, The driver, warned, previous vehicles