Tue, Jul 16, 2019 09:40होमपेज › Pune › गाडी ‘रिव्हर्स गिअर’मध्ये चालविण्याचा उपक्रम

गाडी ‘रिव्हर्स गिअर’मध्ये चालविण्याचा उपक्रम

Published On: Jan 12 2018 1:56AM | Last Updated: Jan 11 2018 10:54PM

बुकमार्क करा
येरवडा : वार्ताहर 

छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यात शांतता नांदावी आणि सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी एकोप्याने राहावे या उद्देश्याने संतोष राजेशिर्के  हा रिव्हर्स गिअरमध्ये गाडी चालविण्याचा आगळा वेगळा उपक्रम करणार आहे. भोर येथील शिंद गवडी ह्या बाजीप्रभू देशपांडे यांच्या जन्म गावापासून त्यांना अभिवादन करून निघणार असून 12 जानेवारी (आज) रोजी जिजाऊ मासाहेबांच्या जयंती दिनी सिंदखेडराजा येथे पोहोचणार आहे.

पुण्यातील संतोष राजेशिर्के ह्याला वेगळेपणाच्या ध्यासाने झपाटले आणि त्या जिद्दीनेच त्याने मराठा क्रांती मोर्चाच्यावेळी पुणे ते मुंबई रिव्हर्स गिअरमध्ये सुरक्षितरित्या चारचाकी चालविण्याचा विक्रम केला. या आधी पुणे ते किल्ले रायगड असा ही प्रवास रिव्हर्स गिअरमध्ये केला आहे. बाजीप्रभू देशपांडे यांच्या जन्म गावापासून त्यांना अभिवादन करून निघणार असून 12 जानेवारी रोजी सिंदखेडराजा येथे पोहोचणार आहे.

असा पहिल्या टप्प्यातील गाडी चालविण्याचा आगळा वेगळा उपक्रम करणार असल्याचे महेंद्र गलांडे यांनी सांगितले. संतोष राजेशिर्के यांचा नगररोड येथे भाजपचे शहर चिटणीस महेंद्र गलांडे यांच्या हस्ते पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.  यानंतर संतोषच्या ह्या छंदाला प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे गलांडे यांनी सांगितले. आता संतोष जिद्दीने सिंदखेडराजा पर्यंतची यात्रा पूर्ण करणार असून त्यानंतर तो स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी 17000 किमीची भारत परिक्रमा करणार आहे.

संतोष राजेशिर्केसह दोन दुचाकीवरून अक्षय पवार निलेश दरेकर व राजाराम राजेशिर्के हे तरुण सहकार्य असणार आहेत. यावेळी वैभव भुजबळ, मोहन मातेरे, बाप्पु पठारे आदी उपस्थित होते.