Sun, May 26, 2019 12:39होमपेज › Pune › एलजीबीटी अभिमान पदयात्रा

तृतीयपंथीयांच्या पदयात्रेत ३७७ कलम रद्द करण्याची मागणी

Published On: Jun 04 2018 1:30AM | Last Updated: Jun 04 2018 12:07AMपुणे : प्रतिनिधी

तृतीयपंथीयांमध्ये दुजाभाव करू नका, तृतीयपंथी, समलैंगिकांना आपले म्हणा, 377 कलम रद्द करा, अशा घोषणा देत तृतीयपंथी, ट्रान्सजेंडर (एलजीबीटी) अभिमान पदयात्रेचे आयोजन समपथिक ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते.  संभाजी बागेपासून ही पदयात्रा सुरु झाली होती. डेक्कनवरुन फर्ग्युसन रस्त्यावरुन पुन्हा संभाजी बागेसमोरच पदयात्रेचा समारोप करण्यात आला. या पदयात्रेते शेकडो लोक सहभागी झाले होते. होमोफोबिया हॅज टू गो, अशा घोषणा  पदयात्रेवेळी देण्यात आल्या. विविध मागण्यांचे फलकही यावेळी हातात धरण्यात आले होते. मागील सात वर्षांपासून ही पदयात्रा पुण्यात काढण्यात येत असून, यंदाचे या रॅलीचे आठवे वर्ष असल्याचे आयोजकांनी सांगितले.

यावेळी समपथिक ट्रस्टचे अध्यक्ष बिंदुमाधव खिरे म्हणाले, एलजीबीटींच्या हक्कांसाठी ही पदयात्रा काढण्यात आली होती. पदयात्रेत जास्तीत जास्त मुख्य प्रवाहातील नागरिक सहभागी होत असून, ते आम्हाला साथ देत आहेत. त्याचबरोबर पोलीस प्रशासनही नेहमीच आम्हाला सहकार्य करीत आले आहे. 377 हे कलम मानवधिकारांचे उल्लंघन करत आहे. त्यामुळे ते कलम काढून टाकले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.