Mon, Jun 24, 2019 16:54होमपेज › Pune › मुंढेंच्या निर्णयाला पीएमपीची धोबीपछाड

मुंढेंच्या निर्णयाला पीएमपीची धोबीपछाड

Published On: Jul 02 2018 1:47AM | Last Updated: Jul 02 2018 1:29AMपुणे : प्रतिनिधी

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएल) तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढेंनी घेतलेल्या निर्णयाला पीएमपीएमएल प्रशासनाने फाटा दिला आहे. तोट्यातील बसमार्गावरील 38 बससेवा बंद केली होती. मात्र, त्यांची बदली होताच महामंडळाने 17 मार्गावर बसेस सुुरू केल्या आहेत. त्यामुळे मुंढेंनी घेतलेला निर्णय चुकीचा होता काय याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

महामंडळाचा आर्थिक तोटा कमी करण्यासाठी मुंढे यांनी तोट्यातील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. विविध निर्णय घेऊन प्रवासी आणि पीएमपीएमएलमध्ये बदल करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. विशेषतः आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रवाशांसाठी अ‍ॅपची सुविधा पुरवणे, ठेकेदारांची मनमानी मोडीत काढणे, कामात हलगर्जीपणा दाखवणार्‍यांना घरचा रस्ता दाखविल्यामुळे पीएमपीएमएलमध्ये कामकाजाला वेग आला  होता. दरम्यान, महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी 27 रस्त्यांवरील 38 बसेसची सेवा बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. मात्र, मुंढे यांची बदली झाल्यानंतर त्यांनी घेतलेला निर्णय बदलून महामंडळाने 17 मार्ग पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.  

‘पीएमपीएमएल’ला प्रत्येक बसमागे प्रति किलोमीटरला 55 रुपये उत्पन्न मिळत आहे. बंद करण्यात आलेल्या मार्गावरील बसेसच्या माध्यमातून पीएमपी प्रशासनाला प्रति किलोमीटर अवघे 12 ते 42 रुपये उत्पन्न मिळत होते. त्यामुळे या मार्गावरील बसेसची सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

बससेवा सुरू करण्यात आलेले मार्ग

स्वारगेट- महंमदवाडी डेक्कन, जिमखाना- विद्यानगर गुजरात कॉलनी- पिंपळे गुरव, कोथरुड डेपो- हडपसर, भेकराईनगर- स्वारगेट, विश्रांतवाडी- आझादनगर, पुणे स्थानक- महंमदवाडी, पुणे स्थानक- हडपसर, पिंपरी- देहूगाव वाकड पूल- हिंजवडी फेज-3, स्वारगेट- निगडी स्वारगेट- धायरी, विश्रांतवाडी- आळंदी, महापालिका भवन- मुंढवा, महात्मा फुले मंडई- पटवर्धन बाग, महापालिका भवन ईशाननगरी, कोथरुड डेपो- महात्मा फुले मंडई.