Sat, Nov 17, 2018 16:51



होमपेज › Pune › पुणेः खेळताना गळफास लागून मुलाचा मृत्यू

पुणेः खेळताना गळफास लागून मुलाचा मृत्यू

Published On: Apr 24 2018 1:49AM | Last Updated: Apr 24 2018 1:49AM



देहूरोड : वार्ताहर

घरात खेळता खेळता गळफास लागून निगडी येथे सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास 8 वर्षांच्या नकुल उल्हास कुलकर्णी या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी आजी-आजोबा घरातील हॉलमध्ये बसले होते, तेव्हा नकुल आतल्या खोलीत खेळत होता. खेळता-खेळता खुंटीला अडकवलेल्या दोरीमध्ये त्याचा गळा अडकून दुर्दैवी अंत झाला. बराच वेळ तो बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी दार ठोठावले; परंतु आतून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता.

अखेर दाराचे कुलूप तोडण्यात आले, तेव्हा खुंटीला अडकवलेल्या दोरीत मृतावस्थेत फसलेला नकुल आढळला. नकुलची काही दिवसांनी मुंज होती. मुंजीचे आमंत्रण देण्यासाठी आई-वडील घराबाहेर गेले होते.