Sun, Nov 18, 2018 00:45होमपेज › Pune › पीठ मळणी यंत्रात अडकून महिलेचा मृत्यू

पीठ मळणी यंत्रात अडकून महिलेचा मृत्यू

Published On: Apr 10 2018 1:40AM | Last Updated: Apr 10 2018 1:22AMपुणे : प्रतिनिधी

पीठ मळणी यंत्रात ओढणी अडकल्याने झालेल्या दुर्घटनेत सुप्रिया संदीप प्रधान (वय 38, रा. गोखलेनगर)  या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गोखले नगर येथे सोमवारी सायंकाळी घडली. 

सुप्रिया प्रधान यांचे गोखलेनगर परिसरात समृद्धी डायनिंग हॉल नावाची मेस आहे. त्यांच्या डायनिंग हॉलमध्ये पीठ मळणी यंत्र आहे. या यंत्राजवळ थांबून सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्या काम करत होत्या. त्यावेळी पीठ मळताना अचानक त्यांची ओढणी यंत्रात अडकली आणि काही कळण्याच्या आत ओढणीसह त्या यंत्रामध्ये ओेढल्या गेल्या.  

त्यांचा आरडाओरडा ऐकून काही जण तेथे आले. त्यांनी यंत्र बंद करून त्यांना बाहेर काढले. यंत्रामध्ये असलेल्या पात्यांमुळे त्यांच्या चेहर्‍याला गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या. त्यांना तातडीने सेनापती बापट रस्त्यावरील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रधान यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी सांगितले.