Thu, Jul 18, 2019 08:56होमपेज › Pune › निर्मात्याला अभिव्यक्ती स्वातंत्र मिळायला हवे : भावे

निर्मात्याला अभिव्यक्ती स्वातंत्र मिळायला हवे : भावे

Published On: May 03 2018 1:31AM | Last Updated: May 03 2018 1:19AMपुणे : प्रतिनिधी

चित्रपट निर्मितीसाठी चांगले तंत्र उपलब्ध आहेत. या तंत्रांचा वापर करून आपण चित्रपटातून जीवनाचा सच्चा शोध घेत आहोत की नाही, हे निर्मिती करणार्‍यांनी बघायला हवे. चित्रपट कला जीवनाचा वेध घेणारी कला आहे. या कलेकडे या दृष्टीने प्रत्येकाने पाहायला हवे. त्यानुसार, चित्रपट निर्मात्याला अभिव्यक्ती स्वातंत्र मिळायला हवे, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी व्यक्त केले.संवाद पुणेतर्फे मराठी चित्रपट संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात चित्रपट सृष्टीत अमूल्य योगदान दिलेल्या दादासाहेब फाळके, दादासाहेब तोरणे, बाबूराव पेंटर आणि अनंत पेंटर कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी 98व्या अखिल भारतिय मराठी नाट्य संमेलनाच्या, ज्येष्ठ संगित नाट्यकर्मी अध्यक्षा किर्ती शिलेदार, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, निकीता मोघे, रघुनाथ कुचित, संवादचे सुनील महाजन, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणीचे सचिन इटकर उपस्थित होते.

सुमित्रा भावे म्हणाल्या, आज चित्रपट मोठ्या मॉल सारखे उभे आहेत. मात्र, त्याचा पाया किती घट्ट आहे, हे दादासाहेब फाळके, दादासाहेब तोरणे, बाबूराव पेंटर यांच्या सारख्या चित्रपटाची निर्मिती करणार्‍यांच्या कामातून कळते. या चित्रपटांची निर्मिती करणार्‍यांचा इतिहास अधिक चांगल्या रीतीने लिहिल्या गेला पाहिजे. त्यानंतर, असे संमेलन समाजासाठी उपयोगी ठरेल. कलाकार समाजाच्या एक पाऊल पुढे असतात. संगीत नाटक ही कला जीवनाचा शोध घेऊ शकते. यामध्ये तंत्र आणि साहित्याचा समावेश आहे. या कलेचे केंद्रीकरण व्हायला नको.कीर्ती शिलेदार म्हणाल्या, अत्यंत दूर दृष्टी असलेल्या माणसाने चित्र व्यवसायाचा पाया घातला. अनेक लोकांना या व्यवसायाने रोजी रोटी मिळवून दिली आहे. हे सर्व मंडळी थोरच आहेत. त्यांनी मराठी चित्रपटाला उंची दिली आहे. कलाकार हा स्वतःच्या अनुभवातून समृद्ध होतो. समृद्ध अनुभव देणार्‍या या नाट्यसृष्टी आणि चित्रपट क्षेत्रात चांगले काम होत राहायला हवे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा दामले यांनी केले.

Tags : Pune, creator, freedom, expression