Sun, Feb 17, 2019 07:35होमपेज › Pune › नगरसेवकाने अभियंत्याला फासले काळे 

नगरसेवकाने अभियंत्याला फासले काळे 

Published On: May 25 2018 1:10AM | Last Updated: May 25 2018 12:54AMपिंपरी :

काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, दत्तवाडी, आकुर्डी गावठाण परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे संतप्त झालेले राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांनी ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयातील पाणीपुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांना काळे फासले. 

पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अत्यंत कमी दाबाने येत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठ्याबाबत अधिकार्‍यांकडे वारंवार तक्रारी केल्या. परंतु, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे, असा आरोप नगरसेवक शेख यांनी केला.

या संदर्भात गुरूवारी (दि.24) बैठकीचे आयोजन केले होते. पाणीपुरवठा कधीपासून सुरळीत होईल, अशी विचारणा नागरिकांसह नगरसेवक शेख यांनी केली. त्यावर अधिकार्‍यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.  त्यामुळे संतप्त झालेले नगरसेवक शेख यांनी पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता सुशीलकुमार लवटे यांना नागरिकांच्या समोरच काळे फासले.