Thu, Apr 25, 2019 08:00होमपेज › Pune › शहरातील पदपथ होणार बंदिस्त 

शहरातील पदपथ होणार बंदिस्त 

Published On: Apr 12 2018 1:19AM | Last Updated: Apr 12 2018 12:27AMयेरवडा : वार्ताहर

परदेशाप्रमाणे पुणे शहरातील पदपथ बंदिस्त करण्याचे नियोजन  महापालिका हाती घेणार आहे. शहरातील पहिला बंदिस्त पदपथ कल्याणीनगर येथे तयार करण्यात आला आहे.   पादचार्‍यांना ऊन, वारा, पाऊस यापासून बचाव होण्यासाठी  स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी प्रायोगिक तत्वावर कल्याणीनगर येथील पदपथ बंदिस्त केले आहेत.

पुणे शहरातील पदपथ अतिक्रमणांनी व्यापले आहेत. पादचार्‍यांना चालण्यासाठी पदपथ शिल्लक राहिले नाहीत. पथारी व्यावसायीकांनी पदपथ व्यापले आहेत. बहुतांश ठिकाणी पादचार्‍यांना चालण्यासाठी पदपथ शिल्लक नाहीत. प्रभाग क्रमांक पाच मध्ये मात्र कल्याणीनगर, राजा शिवछत्रपती उद्यानाच्या बाजूला असणार्‍या पदपथांना ग्रील लावण्यात आले आहेत.  शहरात पदपथांना अनेक ठिकाणी ग्रील लावल्याचे दिसून येते.

मात्र  परदेशात ज्याप्रमाणे पदपथ बंदिस्त आहेत त्याप्रमाणे पदपथ बंदिस्त करण्याची संकल्पना आमदार जगदीश मुळीक  यांच्या संकल्पनेनुसार स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी प्रायोगिक तत्वावर साकारली आहे. मुळीक यांनी बिशप स्कूलसमोरील पदपथ बंदिस्त केला आहे. या बंदिस्त पदपथामुळे पादचार्‍यांना ऊन, पाऊस, वारा यापासुन संरक्षण मिळणार आहे. याशिवाय पदपथावरून गाड्या चालविणे, गाड्या पार्कींग करणे हे थांबणार आहे. पादचार्‍यांना देखील अशा बंदिस्त पदपथावरून सुरक्षित चालता येणार आहे.   बंदिस्त पदपथ दिसायला देखील सुंदर दिसत असून पदपथ असल्याचे काही वेळा लक्षात येत नाही.

त्यामुळे पुणे शहराच्या सौंदर्यात देखील यामुळे भर पडणार आहे. पुणे शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना त्यातच बंदिस्त पदपथाची  संकल्पना उत्कृष्ट आहे. बंदिस्त पदपथे पथारी व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी सोयीची ठरणार आहेत. त्यामुळे बंदिस्त पदपथावर पथारी व्यावसायिकांनी अतिक्रमण  करू नये याची देखील काळजी घेणे आवश्यक आहे.  

स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक म्हणाले, प्रायोगिक तत्वावर कल्याणीनगर येथील बिशप्स स्कूल समोर बंदिस्त पदपथ तयार केला आहे. अशा पदपथामुळे पादचार्‍यांचे ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण होणार आहे. याशिवाय पदपथावर गाड्या लावण्याचे देखील बंद होणार आहे. बंदिस्त पदपथाबाबत सर्वांची मते विचारात घेवून संपूर्ण शहरात करण्याचा आपला विचार आहे.