होमपेज › Pune › महापौरांसमोर नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा

महापौरांसमोर नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा

Published On: May 15 2018 1:32AM | Last Updated: May 15 2018 1:06AMकोरेगाव पार्क : वार्ताहर 

उपनगरात टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. राजकीय होर्डिंग्ज्बाजीमुळे शहराचे विद्रुपिकरण, गरज नसताना जागोजागी रस्त्यांवर हॅलोजन दिवे, सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा, ठेकेदारांकडून वेळेत कामे पूर्ण केली जात नाहीत, त्यामुळेही नागरिकांच्या पैशांच्या अपव्यय होऊन त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र, प्रशासनाकडून पुणे स्मार्ट सिटीचा बोलबाला कशासाठी केला जातोय, अशा अनेक समस्यांचा पाढा नागरिकांनी महापौर मुक्‍ता टिळक यांना वाचून दाखविला. 

वाडिया महाविद्यालयात महापौर आपल्या दारी कार्यक्रमाचे आयाजन करण्यात आले होते.  या वेळी प्रभाग 20 आणि 21 मधील नगरसेवक आणि नागरिक उपस्थित होते. अडीच तास नागरिकांनी महापौरांसह नगरसेवकांना चांगलेच धारेवर धरले. यावर कोणतेही समाधानकारक उत्‍तरे नागरिकांना दिली गेली नाहीत.हायकोर्टाच्या आदेशाचे उल्‍लंघन करीत प्रभागात नगरसेवकांचे फ्लेक्स लावले जातात. आकाशचिन्ह विभागाकडून त्यावर नाममात्र कारवाई केली जाते. हॉकर्स झोन निश्‍चित केलेला नाही त्यामुळे पदपथ, रस्त्यांवर हातागाड्या आणि भाजीविक्रेते ठांण मांडून आहेत नागरिकांना  याचा त्रास होतो.अनधिकृत व्यावसायिकांची संख्येत वाढ होत असून त्यांच्यावर केलेली प्रशासनाची कारवाईही दिखाऊपणाची असते. कारवाईपूर्वीच व्यावसायिकांना फोन जातोय त्यामुळे कारवाई नंतर अवघ्या दहा मिनिटात हातगाड्या कशा काय लागतात हे समजायला आम्ही काही दुधखुळे नाहीत अशा शब्दातच प्रशासनाची खरडपट्टी काढली.

सोसायट्यातील कचर्‍या संदर्भातील समाजिक उपक्रम राबविण्यासाठी आम्ही नागरिक तयार आहोत मात्र कोरेगाव पार्कातील नगरसेवकांकडून सहकार्य मिळत नाही यावर महापौरांनी चारही नगरसेवकांना सुचना करून मोहल्‍ला कमिटीच्या बैठकीला उपस्थित राहून त्यांचे प्रश्‍न समजून घेवून त्यावर उपाय योजना करण्यास सांगितले. कवडेवाडी, दरवडेमळा, मदारवस्ती, रेणूकावस्ती, ताडीवाला रोड आदी भागातील, कचरा, ड्रेनेजसह स्वच्छतागृहाची दयनिय अवस्था आहे. मच्छरांसाठी दुरगामी उपाय योजना करण्याची गरज आहे तसेच भटक्याकुत्र्यांचा प्रश्‍न गंभिर आहे जहाँगीर रस्त्यावर वाहतूक कोंडी वाहनचालकांची डोकेदुखी ठरत आहे. आवश्यक त्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग पाहिजे बेकायदेशीर प्रवाशी वाहतूक थांबली पाहिजे.कोरेगाव पार्कात मद्यपींचा धुडगुस वाढत आहे सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

पाण्याचा प्रश्‍न गंभीर...

ताडीवाला भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न आहे. नवीन पाईपलाईन टाकणे गरजेचे आहे. शासकीय जागेला कंपाउंड करून अनधिकृत बांधकामे रोखावीत त्याचप्रमाणे मनपा शाळाची दुरवस्था झालेली असल्याचे बचत गटाच्या महिलेने सांगितले.