Fri, Apr 19, 2019 12:01होमपेज › Pune › स्वस्त धान्याचे अनुदान थेट बँक खात्यावर जमा होणार

स्वस्त धान्याचे अनुदान थेट बँक खात्यावर जमा होणार

Published On: Aug 29 2018 1:43AM | Last Updated: Aug 29 2018 1:12AMपुणे / मुढंवा : प्रतिनिधी      

गॅसचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा करण्याचा प्रयोग यशस्वी झाला. त्यानंतर आता स्वस्त धान्यांवर मिळणारे अनुदानही लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, मुंबई -ठाण्यातील अ परिमंडळातील दोन स्वस्त दुकानावर प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

पुरवठा विभागाने गॅसप्रमाणे धान्यावर मिळणारे अनुदानाची रक्कम ही आता थेट कुटुंबप्रमुख महिलेच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासंबंधीचा निर्णय पुरवठा विभागाने 21 ऑगस्ट घेतला आहे. त्यामध्ये ज्या शिधापत्रिकाधारक कुटुंबाला अन्नधान्याचा सरळ लाभ (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर) घ्यावयाचा आहे, त्यांना आधार लिंकप्रमाणे अन्नधान्याचा लाभ देण्यात यावा. तसेच ज्या शिधापत्रिकाधारक कुटुंबाला अन्नधान्यावरील अनुदान बँक खात्यात जमा करण्याची इच्छा असेल, त्यांना शिधापत्रिकेवरील अन्नधान्याचे रोख अनुदान बँक खात्यावर जमा करण्यात यावेत, असा आदेश जारी करण्यात आला आहे.

या अनुषंगाने अब्दुल लतिफ जमील प्रॉपर्टी अ‍ॅक्शन लॅब या स्वयंसेवी संस्थेबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला आहे. मुंबई हा प्रकल्प यशस्वी झाल्यास राज्यात सर्वत्र याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.