Sun, Apr 21, 2019 02:42होमपेज › Pune › टेक्नोथलॉनद्वारे नासा व इस्त्रोची संधी

टेक्नोथलॉनद्वारे नासा व इस्त्रोची संधी

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 20 2018 12:46AMपुणे : प्रतिनिधी

राज्यातील 9 वी ते 12 वी मधील विद्यार्थ्यांना आयआयटी गुवाहाटीद्वारे घेण्यात येणार्‍या टेक्नोथलॉन इंटरनॅशनल स्कूल चॅम्पियनशिप स्पर्धेत भाग घेऊन नासा आणि इस्त्रोमध्ये जाण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेची पूर्व परीक्षा 15 जुलै रोजी घेण्यात येणार असून, मुख्य परीक्षा 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरच्या दरम्यान होणार आहे. 

विद्यार्थ्यांमधील रचनात्मक गुणांची प्रतिभा ओळखणे हा या स्पर्धेचा उद्देश असून, पूर्व परीक्षेसाठी गणित, गणितीय कोडे आदी विषयांमधील प्रश्‍न असणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये दोन-दोन विद्यार्थ्यांची टीम केली जाणार आहे. यामध्ये एक ज्युनिअर, तर एक सीनिअर ‘स्कॉऊड’ राहणार आहे. या दोन वर्गांतील 8 विद्यार्थ्यांची अंतिम फेरीतून निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील टॉप 50 टीमला गोल्ड, तर त्यानंतरच्या 200 टिमांना सिल्वर सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. 

या स्पर्धेची मुख्य परीक्षा आयआयटी गुवाहाटी येथे होणार आहे. यामध्ये यशस्वी दोन वर्गांतील पहिल्या दोन टीमला नासा, तर दुसर्‍या स्थानावर असलेल्या टीमला इस्त्रो येथे सहलीसाठी पाठविण्यात येणार आहे. याचा सर्व खर्च आयआयटी गुवाहाटी आणि नासाद्वारे करण्यात येणार आहे. या स्पर्धेत राज्यातील विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार असून, ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीनेही नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी  www.technothlon.techniche.org वर रजिस्ट्रेशन करता येणार आहे.

जिल्ह्यांच्या ठिकाणी होणार पूर्व परीक्षा... 

या स्पर्धेची पूर्व परीक्षा जिल्ह्यांच्या ठिकाणी होणार आहे. ही परीक्षा पुणे, मुंबई, अमरावती, औरंगाबाद, नाशिकसह  राज्यातील अनेक मोठ्या शहरात घेण्यात येणार आहे.