Wed, Nov 14, 2018 03:49होमपेज › Pune › पोटाला पिस्तूल लावून चैन हिसकावली

पोटाला पिस्तूल लावून चैन हिसकावली

Published On: Apr 18 2018 1:41AM | Last Updated: Apr 18 2018 1:32AMपुणे : प्रतिनिधी

रंगपंचमीत झालेल्या वादातून एकाला अडवून पोटाला पिस्तूल लावत गळ्यातील 50 हजाराची सोनसाखळी आणि खिशातील रोकड दोघांनी लुटून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. बिबवेवाडीत हा धक्कादायक प्रकार वर्दळीच्या वेळी घडला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी शिवा उर्फ अशीतोष रणदिवे (वय 29, इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीतील आहेत. त्यांच्यात रंगपंचमीदिवशी वाद झाला होता. दरम्यान फिर्यादी हे रविवारी (दि. 15 एप्रिल) सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना आवाज देऊन बिबवेवाडीतील पीएमपीएल बस स्टॉपजवळ थांबवले. तसेच, रंगपंचमी दिवशी झालेल्या वादातून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर एकाने पिस्तूल काढून फिर्यादींच्या पोटाला लावले. तसेच, जबरदस्तीने त्यांच्या गळ्यातील 50 हजार रुपयांची सोन्याची साखळी आणि खिशातून 300 रुपयांची रोकड काढून घेतली. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक जाधव हे करत आहेत. 

Tags : Pune, chain, snatches, pistol