Wed, Mar 27, 2019 06:01होमपेज › Pune › नगरसेवक कुंदन गायकवाड, बोईनवाड यांचे पद धोक्यात?

नगरसेवक कुंदन गायकवाड, बोईनवाड यांचे पद धोक्यात?

Published On: Mar 06 2018 1:02AM | Last Updated: Mar 06 2018 1:02AM पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भाजपचे नगरसेवक कुंदन गायकवाड आणि नगरसेविका यशोदा बोईनवाड यांचे जात वैधता प्रमाणपत्र पालिका प्रशासनाकडे अद्याप दाखल न झाल्याने त्याचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे. बोइनवाड यांच्या प्रकरणास न्यायालयानी स्थगिती असून, गायकवाड यांचा न्यायालयीन निकाल येत्या 10 दिवसांत अपेक्षित आहे.महापालिकेची निवडणुक फेबु्रवारी 2017 ला झाली. निवडणुकीनंतर 6 महिन्यांच्या मुदतीमध्ये एससी व एसटी या राखीव गटांतून विजयी उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट आहे. मात्र, विविध कारणांमुळे सुमारे 4 नगरसेवकांनी मुदतीमध्ये प्रमाणपत्र सादर केले नव्हते. त्यातील बहुतांश नगरसेवकांचे जात वैधता प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. चिखली प्रभाग क्रमांक एक ‘अ’चे भाजपचे नगरसेवक गायकवाड आणि भोसरी प्रभाग क्रमांक सहा ‘अ’च्या भाजपच्या नगरसेविका बोईनवाड यांचे प्रकरण अद्याप न्यायालयात सुरू आहे. बोईनवाड यांच्या प्रकरणास स्थगित मिळाली आहे. तर, गायकवाड यांच्या संदर्भातील निकाल येत्या 10 दिवसांमध्ये अपेक्षित आहे. 

दरम्यान, बोपखेल- दिघी प्रभाग क्रमांक चार ‘ब’चे भाजपचे नगरसेवक लक्ष्मण उंडे यांच्या संदर्भात अनधिकृत बांधकामांची तक्रार पालिकेस प्राप्त झाली होती. त्यास संदर्भात पालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने उंडे यांनी कारणे दाखवा नोटीस पाठविली होती. त्या संदर्भात पालिकेच्या निवडणुक विभागात संबंधित विभागाकडून अहवाल प्राप्‍त झाला. मात्र, संबंधित तक्रारदाराने तक्रार मागे घेतल्याने हे प्रकरण ‘क्‍लोज’ करण्यात आले असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. 

तर, क्रीडा समितीचे सभापती व चर्‍होली-मोशी प्रभाग क्रमांक तीन ‘ड’चे भाजपचे नगरसेवक लक्ष्मण सस्ते यांनी निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात गुन्हासंदर्भातील माहिती अर्धवट दिली आहे. त्यामुळे त्यांनी खरी माहिती लपविल्याची तक्रार पालिकेस प्राप्त झाली आहे. त्यानुसार पालिकेचे अधिकारी तपासणी करीत आहेत.
सदर सर्व प्रकरणी पालिकेच्या निवडणुक विभागामार्फत चौकशी केली जात आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर तसा अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविला जाणार आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.