Mon, Aug 19, 2019 05:18होमपेज › Pune › अंत्यविधीनंतर बाहेर काढला बालकाचा मृतदेह

अंत्यविधीनंतर बाहेर काढला बालकाचा मृतदेह

Published On: Jul 09 2018 1:05AM | Last Updated: Jul 08 2018 10:33PMभवानीनगर : सणसर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती झालेल्या महिलेच्या नवजात बालकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने अंत्यविधी झाल्यानंतर या बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुन्हा बाहेर काढण्यात आला. यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील, वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहायक पोलिस निरीक्षक अरविंद काटे, भवानीनगर पोलिस दूरक्षेत्राचे प्रभाकर बनकर, वसंत वाघोले, रमेश शिंदे, पोलिस पाटील राजेंद्र चव्हाण व तक्रारदार ग्रामस्थ उपस्थित होते. 

दरम्यान अंत्यविधी केलेला मृतदेह बाहेर काढताना पंचनामा करण्यात आला. तसेच या नवजात बालकाच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी संशय घेतल्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याबाबत सचिन रणदिवे यांनी तहसीलदार व वालचंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. अशोकनगर (भवानीनगर, ता. इंदापूर) येथील मोनिका सचिन रणदिवे यांची शनिवारी (दि. 7) सकाळी सणसर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती झाली होती. प्रसूतीनंतर काही वेळात नवजात बालकाच्या नाकातून रक्तस्राव झाल्याने सणसर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती करणार्‍या महिला कर्मचार्‍याने या बालकाला सणसरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यास सांगितले. त्यावरून नातेवाईकांनी या नवजात बालकाला सणसरमधील खासगी रुग्णालयात नेले. या डॉक्टरांनी भवानीनगरमधील खासगी रुग्णालयात नेण्यास सांगितले. भवानीनगरमधील डॉक्टरांनी बारामतीमध्ये नेण्यास सांगितले.