Wed, Jan 16, 2019 13:50होमपेज › Pune › मासिक पाळी येण्याचे वय होतेय कमी

मासिक पाळी येण्याचे वय होतेय कमी

Published On: Jun 26 2018 1:15AM | Last Updated: Jun 26 2018 12:54AMपुणे : ज्योती भालेराव-बनकर

बदलेली जीवनशैली, वाढता ताण, आहाराच्या अयोग्य सवयी, व्यायामाचा अभाव, प्रदूषण अशा अनेक कारणांमुळे सध्या मुलींमध्ये मासिक पाळी येण्याचे वय नैसर्गिक 13 ते 14 वरून आता वय वर्षे 9 ते 10 पर्यंत अलीकडे येत आहे. मुलींमध्ये होणारे हे बदल कसे स्वीकारावेत, त्यांच्याशी कशा पद्धतीने संवाद साधावा हे पालकांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.

सध्या पालकांबरोबरच  7 वी 8 वीच्या विद्यार्थिनींना शाळेत तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत वयात येताना शरीरामध्ये होणारे बदल, या बदलाला कसे सामोरे जावे, घ्यावयाची काळजी आदी गोष्टींची माहिती देण्यात येते. दोन मुलींच्या आई उमा भारती यांनी सांगितले (नाव बदलले आहे) माझी मोठी मुलगी आणि लहान मुलगी यांच्या वयात सुमारे 7 वर्षांचे अंतर आहे. माझ्या मोठ्या मुलीला मासिक पाळीची सुरुवात ती नववीत असताना झाली. मात्र दुसर्‍या मुलीला ती पाचवीत असतानाच पहिली मासिक पाळी आली. मी चांगल्या स्त्री-रोग तज्ज्ञाची मदत घेतली.