Wed, Apr 24, 2019 12:02होमपेज › Pune › अध्यक्षांना पुन्हा ‘साहित्य दिंडी’त येण्याची इच्छा

अध्यक्षांना पुन्हा ‘साहित्य दिंडी’त येण्याची इच्छा

Published On: Dec 09 2017 1:45AM | Last Updated: Dec 08 2017 11:47PM

बुकमार्क करा

पुणे :  प्रसाद जगताप

सोशल मीडियावर अनेक चांगल्या-वाईट, विनोदी गोष्टी घडतात. अशीच एक चांगली गोष्ट आठ महिन्यांपूर्वी अपघाताने घडली होती. ज्यामुळे राज्यातील साहित्य क्षेत्रात धांदल उडाली होती. ती  म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्याकडून अनवधानाने 256-श्रश्रश्र या नावाचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार झाला होता. त्यानंतर खुलासा देऊन ते त्या ग्रुपमधून बाहेरही पडले. मात्र त्यांनी ग्रुपमध्ये समावेश केलेल्या साहित्यिकांचा अजूनही ग्रुपमध्ये सक्रिय सहभाग असून, हा ग्रुप क्रिएटरविना आठ महिन्यांनंतर सुरूच आहे.

साहित्यिकांना एका छत्राखाली आणण्यासाठी अध्यक्षांनी हा ग्रुप तयार केला असेल. या समजुतीने राज्यातील बरेच साहित्यिक त्यात सामील झाले होते. दरम्यान, खुद्द निर्माते, त्यातून बाहेर पडले तरी हा ग्रुप सुरू राहिल्याने त्यात पुन्हा आपला समावेश करावा अशी विनंती, गु्रपचे निर्माते श्रीपाद जोशी यांनी आता केली आहे. 

256-श्रश्रश्र या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये  डाव्या-उजव्या विचारसरणीचे साहित्यिक होते. एखादी पोस्ट पडली की, त्यावरून मोठ-मोठी चर्चासत्रे रंगू लागली. वाद-विवाद घडले. नाराज होऊन अनेकजण बाहेर पडले; तरीदेखील ग्रुप  सुरू राहिला आहे, विशेष  त्यामुळे साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी पुन्हा एकदा साहित्यिकांना आता पुन्हा एकदा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आणावे, असे मत ग्रुपमधील एका सदस्याने ‘पुढारी’च्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

मला पण पुन्हा घ्या

256-श्रश्रश्र हा ग्रुप अनवधानाने सुरू झाला. ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करत होतो. तेव्हा, चुकून हा ग्रुप तयार झाला. यासंदर्भात मी क्षमस्व आहे, असा खुलासादेखील मी दिला होता; पण ग्रुप चांगला चालला आहे. त्यामुळे मी आश्‍चर्यचकित झालो आहे.  जो कोणी अ‍ॅडमिन असेल त्याने मला पुन्हा सहभागी करून घ्यावे, ही विनंती.

- श्रीपाद जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ