Sat, Nov 17, 2018 16:30



होमपेज › Pune › ‘नागपूर मेट्रो’चे स्टिकर्स उतरविले

‘नागपूर मेट्रो’चे स्टिकर्स उतरविले

Published On: Jul 11 2018 1:38AM | Last Updated: Jul 11 2018 1:00AM



पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड शहरात पुणे मेट्रोचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या लोखंडी बॅरिकेटसवरील ‘नागपूर मेट्रो’चे स्टिकर्स मंगळवारी (दि.10) तातडीने काढून टाकण्यात आले.‘उद्योनगरीत पुणे ऐवजी ‘नागपूर मेट्रो’; कासारवाडीतील बॅरिकेटसवर ‘नागपूर मेट्रो’चे स्टिकर्स’ या शीर्षकाखाली ‘पुढारी’ने मंगळवारी छायाचित्रासह ठळक वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची तातडीने दखल घेत महारेल मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेडने ‘नागपूर मेट्रो’ असलेले स्टिकर्स काढून टाकले. 

मेट्रोचे मोरवाडी, पिंपरी ते दापोडीपर्यंत मार्गिकेचे काम वेगात सुरू आहे. नुकतेच कासारवाडीतील नाशिक फाटा चौकात काम सुरू झाले आहे. त्या ठिकाणी सर्व्हिस रस्ता व ग्रेडसेपरेटरचे प्रत्येकी एक लेन बंद करून लोखंडी बॅरिकेटस लावण्यात आले आहेत. त्या बॅरिकेटसवर ठळकपणे ‘नागपूर मेट्रो’ असा उल्लेख आहे. त्यामुळे शहरातील नागरिक संभ्रमात पडले होते. या संदर्भात ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध करताच मेट्रो प्रशासनाने तातडीने बॅरिकेटसवरील स्टिकर्स काढून टाकले आहेत. आज दिवसभर मेट्रोचे कर्मचारी स्टिकर्स काढण्याचे काम करताना दिसत होते.