Wed, Jan 16, 2019 13:54होमपेज › Pune › मुंबई-पुणे द्रुतगतीवर दरड कोसळली

मुंबई-पुणे द्रुतगतीवर दरड कोसळली

Published On: Jun 24 2018 1:34AM | Last Updated: Jun 24 2018 1:09AMलोणावळा ः

मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर खालापूर टोलनाक्याजवळ किमी 36/400  दरड कोसळली.  शनिवारी (दि. 23) सकाळी दहा वाजेच्या सुमारास मुंबईहून-पुण्याकडे येणार्‍या लेनवरती एका कंटेनरच्यासमोर ही दरड पडली. यामुळे पुण्याकडे येणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

शुक्रवारी सायंकाळपासून परिसरात झालेल्या जोरदार पावसाने ही दरड कोसळली. घटनेची माहिती मिळताच आयआरबी कंपनीच्या यंत्रांच्या साहाय्याने सदर दरड बाजूला करण्यात आली.