Sat, Jul 20, 2019 15:02होमपेज › Pune › २०२१ पर्यंत मेट्रो धावणार 

२०२१ पर्यंत मेट्रो धावणार 

Published On: Feb 13 2018 2:01AM | Last Updated: Feb 13 2018 1:53AMपुणे : प्रतिनिधी

जागतिक स्तरावरील तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून, पुणे मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. पुणे मेट्रोमध्ये जागतिक स्तरावरील सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, प्रकल्पाचे काम अधिक वेगाने सुरू आहे. सर्व प्रकारचे अडथळे दूर करून पुण्यात प्रत्यक्षात 2021 पर्यंत मेट्रो धावेल, अशी ग्वाही महाराष्ट्र मेट्रोचे कार्यकारी अध्यक्ष रामनाथ सुब्रमण्यम यांनी दिली. 

एमआयटीच्या लोणी काळभोर येथील कॉलेज ऑफ मॅनेजमेंट यांच्यातर्फे आयोजित चौथ्या राष्ट्रीय बांधकाम आणि ट्रान्सपोर्ट परिषदेच्या पहिल्या सत्रात  सुब्रमण्यम बोलत होते. या वेळी क्रेडाईचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, मिटकॉनच्या संचालिका प्रा. सुनीता कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील राय आदी उपस्थित होते. 

सुब्रमण्यम म्हणाले की,   ग्रीन मेट्रो सोलार स्टेशन, वेगवेगळ्या पद्धतीचे स्थानक डिझाईन, फ्री वाय-फाय, सायकल सेवा, पार्किंग सुविधा, सर्व स्थानकांना शहर वाहतूक सेवेने जोडणे, मोकळा पदपथ, रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा पुरविण्यात येणार आहे. 

शांतिलाल कटारिया म्हणाले, देशात बांधकाम क्षेत्रातील युवकांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. नियोजित आणि मजबूत बांधकामासाठी नियोजनाची गरज असते. बांधकाम आणि तंत्रज्ञान व वाहतूक व्यवस्थेत करिअर करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध  आहे.  या वेळी प्रा. सुनीता कराड, पुणे मेट्रोचे सल्लागार शशिकांत लिमये यांनी मनोगते व्यक्त केली.