Thu, Apr 25, 2019 16:25होमपेज › Pune › पद्मावत चित्रपटाने बुडवलेला महसूल शासनाने वसूल करावा

पद्मावत चित्रपटाने बुडवलेला महसूल शासनाने वसूल करावा

Published On: Jan 26 2018 1:22AM | Last Updated: Jan 25 2018 10:43PMपुणे ः

संजय लीला भन्साळी प्रॉडक्शन्स यांचा पद्मावत या चित्रपटाने शासनाचा महसूल बुडविला असून, तो दंडासह वसूल करावा. तसेच शासनाला खोटी माहिती पुरवल्याबद्दल संबंधितांवर फौजदारी करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे मिलिंद धर्माधिकारी यांनी केली.

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथील मसाई पठार येथे पद्मावत चित्रपटाचे 20 दिवस चित्रीकरण केले होते. मात्र, चित्रीकरणासाठी नियमानुसार शासनाला देय असलेल्या एकूण 1 लाख 91 हजार 458 रुपयांच्या शुल्कापैकी 1 लाख 62 हजार 742 रुपयांचे शुल्क बुडवून शासनाची फसवणूक करण्यात आली आहे.