Wed, Jun 26, 2019 23:32होमपेज › Pune › #Women’sDay‘दामिनी’मुळे मिळतेय सुरक्षेची हमी

#Women’sDay‘दामिनी’मुळे मिळतेय सुरक्षेची हमी

Published On: Mar 08 2018 1:21AM | Last Updated: Mar 08 2018 1:21AMविविध क्षेत्रात उंच भरार्‍या घेणारी ‘ती’ आजही असुरक्षित वातावरणाखाली वावरत आहे. तिच्यावरील हे असुरक्षिततेचे सावट बाजूला करून तिला सुरक्षेची सावली देण्यासाठी विविध महाविद्यालयांमध्ये ‘दामिनी’ पथक कार्य करत आहे. या पथकामुळे महाविद्यालयीन तरूणींची छेड काढणार्‍यांवर चांगलाच जरब बसत असून या तरूणी निर्भयपणे आपले शिक्षण पूर्ण करत आहेत. आजही अनेक महाविद्यालये, शाळांमध्ये काही तरूण मुलींची छेड काढत असल्यामुळे त्यांचे शिक्षणाचे नुकसान झालेले पहायला मिळते.

अशाच या समाजकंटकांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांतर्फे  दामिनी पथक तयार करण्यात आले आहे.  या पथकाचे मुख्य कार्य म्हणजे स्टंटबाजीला आवर घालणे हे होय. महाविद्यालयात जर कोणी मुलींची छेड काढत असेल तर त्याला समज देण्याचे काम या पथकातील महिला करतात. संबंधित मुलांच्या पालकांना बोलावून समजवलेही जाते. जर एखादा मुलगा उगाचच कर्णकर्श्श आवाजात हॉर्न वाजवत असेल तर हे पथक त्याला सज्जड दम भरण्याचे काम करते.  सध्या दापोडी परिसरात पोलिस निरीक्षक कल्पना जाधव व उपपोलीस निरीक्षक योगिता कुदळे यांच्या नेतृत्वाखाली सुवर्णा कंगेल्लु व आरती कसबे या महिला या पथकात अतिशय उत्तमपणे आपली कामगिरी बजावताना  दिसून येत आहे. 

या पथकातील महिला भोसरी, सांगवी तसेच अन्य जवळपासच्या महाविद्यालयातील प्राचायार्ंची भेट घेऊन तरूणींना सुरक्षित वातावरण देण्यासाठी प्रोत्साहित करतात. अनेक तरूणीही अगदी मनमोकळेपणाने या पथकातील महिलांना आपल्या समस्या सांगतात. आतापर्यंत कसबे व कंगेल्लु यांनी 1 हजार 520 खटले दाखल केले आहेत. कोणत्याही तरूणाला नाहक त्रास दिला जात नाही. अल्पवयीन मुलांना समज कमी असल्याने त्यांच्याकडून बर्‍याचदा असे प्रकार घडतात. अशावेळी या तरूणांना योग्य ती समज देऊन प्राचार्यांकडे नेऊन त्यांच्याकडून लेखी जबाब घेतला जातो.  या पथकामुळे एक प्रकारचे शिस्तीचे वातावरण निर्माण झालेले सध्या पहायला मिळत आहे.

- संगिता पाचंगे