Thu, Feb 21, 2019 18:04होमपेज › Pune › ब्राह्मण महासंघाची पंतप्रधानांकडे मागणी

दलित समाजाच्या व्यक्तीला मुख्यमंत्री करा

Published On: Jan 26 2018 1:22AM | Last Updated: Jan 25 2018 10:58PMपुणे :

सध्याच्या परिस्थितीत मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी आदी प्रश्‍न अद्याप ही सुटलेले नाहीत. त्यातच कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेची कसून चौकशी करण्यात यावी. गेल्या तीन वर्षामध्ये ब्राह्मण समाजाचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात सत्तेत आल्यानंतर अनेक घटना घडल्यामुळे ज्या-ज्या राज्यात ब्राह्मण समाजाचा मुख्यमंत्री आहे तेथे दलित समाजाच्या व्यक्तीकडे मुख्यमंत्री पद सोपवावे, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. 

देशपांडे म्हणाले, कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेचा मुख्य सुत्रधार माहिती आहे. असे असतानाही मिलिंद एकबोटे, भिडे गुरुजी आणि आनंद दवे यांना फाशी देण्याची मागणी होत आहे. सर्व समाजांमध्ये ब्राह्मण समाजाला मोठा भाऊ मानला जात असेल तर आपल्या लहान भावासाठी मुख्यमंत्री पद दलित समाजाला द्यावे.