Thu, Jul 18, 2019 16:29होमपेज › Pune › डीएसकेंना कार्यालयात जाण्याची परवानगी नाकारली

डीएसकेंना कार्यालयात जाण्याची परवानगी नाकारली

Published On: Jun 08 2018 1:23AM | Last Updated: Jun 08 2018 12:57AMपुणे : प्रतिनिधी

मागील 45 वर्षाचा लेखा जोखा न्यायालयासमोर मांडायचा आहे. त्यामुळे 6 दिवस कार्यालयात जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी कोठडीत असणारे डीएस कुलकर्णी यांनी न्यायालयात केली. सत्र न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी ही मागणी  फेटाळून लावली. न्यायालयात युक्तीवाद करता यावा अशीही मागणी डिएसकेच्या वतीने करण्यात आली.

मात्र वकील नियुक्त केल्यानंतर पक्षकारांना युक्तीवाद करता येत नसल्याचे सरकारी पक्षातर्फ न्यायालयाच्या निदर्शन आणून दिले. वकिलामार्फत म्हणणे सादर करण्यास न्यायालयाने  सांगितले. दोषारोप पत्रासोबत कंपनीचा लेखाजोखा जोडण्यात आला नसल्याने मला जामीन देण्यात यावी अशीही मागणी यावेळी डीएसकेच्या वतीने करण्यात आली.  याप्रकरणी 21 जुन रोजी सुनावणी होणार आहे. विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनी काम पाहिले.