Thu, Jun 27, 2019 14:12होमपेज › Pune › विषय समित्यांवर भाजपचाच वरचष्मा

विषय समित्यांवर भाजपचाच वरचष्मा

Published On: Jan 17 2018 2:03AM | Last Updated: Jan 17 2018 12:45AM

बुकमार्क करा
तळेगाव दाभाडे : वार्ताहर

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विविध विषय समितीचे सदस्य आणि सभापती यांच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. सर्वच समित्यांच्या सभापतिपदी सत्तारूढ भारतीय जनता पक्षाचे सदस्य निवडले गेले.

समितीचे सदस्य आणि सभापतिपदाच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. पीठासन अधिकारी म्हणून मावळचे तहसीलदार रणजित देसाई तर सहाय्यक म्हणून मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी काम पाहिले. यावेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुनील शेळके व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पहिल्या सत्रात समिती सदस्यांच्या तर दुसर्‍या सत्रात सभापतिपदाच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या.

नगर परिषदेत भारतीय जनता पक्ष, जनसेवा विकास आघाडी व रिपब्लिकन पक्षाची महाआघाडी असून त्यांचे एकुण वीस सदस्य आहेत. तर तळेगाव शहर विकास सुधारणा समितीचे सहा सदस्य आहेत. सदस्य संख्येप्रमाणे सत्तारूढ गटाचे पाच तर विरोधी पक्षाचे दोन सदस्य निवडले गेले.  याशिवाय स्थायी समितीचे सदस्य म्हणून शोभा भेगडे, श्रीमती सुलोचना आवारे आणि किशोर भेगडे यांची बिनविरोध निवड झाली.

 विशेष समितीकरिता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत निवडण्यात आलेले सभापती व सदस्य पुढीलप्रमाणे ः 
  सार्वजनिक बांधकाम समिती - सभापती -संदीप बाळासाहेब शेळके सदस्य - इंद्रकुमार राजमल ओसवाल, शोभा अरुण भेगडे, संतोष आनंदा शिंदे, मंगल सुरेश जाधव, रोहित महादू लांघे, अरुण बबन माने   शिक्षण समिती - सभापती - विभावरी रवींद्र दाभाडे, सदस्य- नीता अशोक काळोखे, कल्पना सुरेश भोपळे, हेमलता चंद्रभान खळदे, संग्राम बाळासाहेब काकडे, वैशाली प्रमोद दाभाडे, विशाल अशोक दाभाडे  स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती - सभापती - अरुण जगन्नाथ भेगडे, सदस्य-काजल प्रदीप गटे, प्राची  दळवी (हेंद्रे), संतोष शिंदे, अनिता पवार,  सचिन टकले,  संतोष भेगडे.   पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण  समिती - सभापती -सुनील शेळके. सदस्य - नीता  काळोखे, मंगल जाधव, इंद्रकुमार ओसवाल, सुलोचना आवारे, बापूसाहेब  भेगडे, किशोर भेगडे. 
  नियोजन व विकास समिती - सभापती - अमोल शेटे. सदस्य - सुशील उर्फ विजय सैंदाणे, कल्पना भोपळे, गणेश खांडगे, रोहित लांघे, सचिन टकले, बापूसाहेब भेगडे. 
  महिला व बालकल्याण समिती सभापती- संध्या भेगडे, उपसभापती- प्राची दळवी (हेंद्रे), काजल गटे, हेमलता खळदे, अनिता पवार, मंगल भेगडे, वैशाली दाभाडे.   स्थायी समिती -पदसिध्द सभापती

नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, सर्व समिती सभापती  शोभा अरुण भेगडे, सुलोचना आवारे, किशोर भेगडे यांची निवड करण्यात आली.