Mon, Apr 22, 2019 16:17



होमपेज › Pune › ‘एकविरा’ला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देणार 

‘एकविरा’ला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देणार 

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 11 2018 12:04AM



कार्ला : वार्ताहर 

आई एकविरादेवी मंदिराच्या परिसरात भविष्यात विकासाची गंगा वाहणार आहे; तसेच ह्या एकविरा देवस्थानाला ’ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन जिल्ह्याचे पालकमंत्री  गिरीश  बापट यांनी कार्ला वेहरगाव एकविरा गड पायथा मंदिर येथे नानेमावळ भाजप कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी दिले.

या वेळी वेहरगाव दहिवली ग्रुपग्रामपंचायत सरंपच दत्तात्रय पडवळ, गणपत पडवळ, संतोष  रसाळ, विश्वस्त विजय देशमूख, संजय गोविलकर, पार्वती पडवळ, मधुकर पडवळ, ग्रा पं. सदस्या सपना देशमूख, कल्पना माने, गुरुदास पडवळ, मोरेश्वर पडवळ, गणेश पवार, लतिफ शेख, गणेश पडवळ, युवराज पडवळ, शंकर पडवळ, सुनिल बोरकर, प्रविण देशमुख, मिलिंद बोरकर, तेजस खिरे, उध्दव फाकटकर,आकाश तिकोणे यांच्यासह  वेहरगाव दहिवली येथील दोनशे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 10) पालकमंत्री गिरीश  बापट, आ. संजय भेगडे यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला.
वेहरगाव पायथा येथे मंगळवारी नाणेमावळ भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत घेण्यात आला होता.  या प्रसंगी बोलताना बापट म्हणाले की,  एकविरा पायथ्याशी असणार्‍या टपरी धारकांवर उपासमार होण्याची वेळ येऊ देणार नाही व वनमंत्री सुधीरजी मुनगुंटीवार यांच्याशी चर्चा करुन सर्व टपर्‍या  कायम करणार असल्याचा शब्द तुम्हाला देतो.

आ. संजय भेगडे म्हणाले की, या गावातील प्रत्येक दुकान कायम व कायदेशीर केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. एकविरादेवी पायथा ते कार्ला फाटा ते मळवली ते लोहगड रस्त्यासाठी अडीच कोटी रुपये निधी मंजूर झाला असून, कामाचे लवकरच भुमिपूजन करणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. यावेळी आमदार संजय बाळा भेगडे, सभापती गुलाबराव म्हाळस्कर, शांताराम कदम, तालुका अध्यक्ष प्रशांत ढोरे, भास्करराव म्हाळस्कर, तळेगाव उपनगराध्यक्ष सुनिल शेळके, नंदाताई सातकर, युवती अध्यक्षा राणीताई म्हाळस्कर, माजी सभापती राजाराम शिंदे, माऊली दळवी, ज्ञानेश्वर शिंदे, बाळासाहेब जाधव आदी  उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक भरत मोरे यांनी, तर सूत्रसंचालन जितेंद्र बोत्रे, विनायक कोंढभर व आभार  सचिन येवले यांनी मानले.