Thu, Jun 04, 2020 05:01होमपेज › Pune › सातवा आरोग्य चित्रपट महोत्सव २२ व २३ डिसेंबरला

सातवा आरोग्य चित्रपट महोत्सव २२ व २३ डिसेंबरला

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 15 2017 1:26AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

येत्या 22 व 23 डिसेंबर रोजी सातव्या आरोग्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन लॉ कॉलेज रोडवरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) येथे करण्यात आले आहे. ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व यु. एस. के. फाऊंडेशनच्या संस्थापिका उषा काकडे यांच्या हस्ते 22 डिसेंबरला या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. 

पी. एम. शहा फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात आरोग्य हा विषय केंद्रस्थानी ठेवून बनवलेले 30 चित्रपट रसिकांना विनामुल्य पाहायला मिळणार आहेत. यात 19 लघुपट व 11 माहितीपटांचा समावेश आहे. या महोत्सवात महाराष्ट्रासह केरळ, तमिळनाडू, तेलंगणा, पश्चिम बंगाल व राजस्थान या राज्यांमधून तसेच इराण आणि बेल्जियममधून तयार केलेले आरोग्य चित्रपट बघायला मिळणार आहेत. 23 डिसेंबरला युवा अभिनेते आलोक राजवाडे व पर्ण पेठे यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप होणार आहे, अशी माहिती शहा फाउंडेशनचे संचालक अ‍ॅड. चेतन गांधी यांनी दिली.