Tue, Apr 23, 2019 14:25होमपेज › Pune › पुणे विद्यापीठाचा 113 वा पदवी प्रदान समारंभ 1 जूनला

पुणे विद्यापीठाचा 113 वा पदवी प्रदान समारंभ 1 जूनला

Published On: May 30 2018 2:21AM | Last Updated: May 30 2018 1:33AMपुणे : प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 113 वा पदवी प्रदान समारंभ येत्या शुक्रवारी (दि. 1 जून) आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विदेश मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे उपस्थित राहणार असून कुलगुरु डॉ. नितीन करमळकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. प्रमुख पाहुणे या नात्याने ज्ञानेश्‍वर मुळे दीक्षान्त भाषण करणार आहेत. या कार्यक्रमात तब्बल 7 हजार 242 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार असून 11 जणांना सुवर्णपदके प्रदान केली जाणार आहेत. 

युजीसीच्या निर्देशानुसार विद्यापीठाचा वर्षातून दोनदा पदवी प्रदान आयोजित केला जातो. या समारंभात शैक्षणिक वर्ष 2016-17 आणि त्याआधी उत्तीर्ण पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील एकूण 7 हजार 242 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. यामध्ये पीएचडी पदवी 104, एम.फिल 54, पदव्युत्तर पदवी 3 हजार 6, पदव्युत्तर पदविका 63, पदवी 3 हजार 994 आणि पदविका प्राप्त 21 जणांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभर संध्याकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, प्रशासन भवनाजवळील नव्याने बांधण्यात आलेल्या परीक्षा भवनात विद्यार्थ्यांना सकाळी 11 ते दुपारी 4 या काळात पदव्या दिल्या जाणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांनी दिली.

सुवर्णपदक विजेते विद्यार्थी 

(विज्ञान व तंत्रज्ञान विभाग) : 1) पर्सिस्टंट बेस्ट एमटेक थिसिस गोल्ड मेडल - देवयानी पाटील, सिव्हील अ‍ॅन्ड एन्वायरोन्मेंटल टेक्नॉलॉजी, 2) झेनस्टार बेस्ट एसटेक थिसिस गोल्ड मेडल - आकाश हजारी, कॉम्प्युटर अ‍ॅन्ड इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी, 3) प्राज बेस्ट एमटेक थिसिस गोल्ड मेडल - उदय सुतार, केमिकल अ‍ॅन्ड बायो टेक्नॉलॉजी, 4) केपीआयटी बेस्ट एमटेक थिसिस गोल्ड मेडल - गंभीर विद्याधर, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, 5) प्राज बेस्ट पीएचडी थिसिस गोल्ड मेडल - अनुश्री कोगजे, केमिकल अ‍ॅन्ड बायोटेक्नॉलॉजी, 6) केपीआयटी बेस्ट पीएचडी थिसिस गोल्ड मेडल - भूषण गरवारे, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, 7) पर्सिस्टंट बेस्ट पीएचडी थिसिस गोल्ड मेडल - प्रज्ञा दीक्षित, सिविल अ‍ॅन्ड एनवायरोन्मेंट टेक्नॉलॉजी, 8) फोर्ब्ज मार्शल बेस्ट एमटेक थिसिस गोल्ड मेडल - सायली काळे, मेकॅनिकल अ‍ॅन्ड मटेरियल टेक्नॉलॉजी, 9) अभिजित एअर सेफ्टी फाऊंडेशन बेस्ट एमटेक थिसिस गोल्ड मेडल - सुधीर माळी, एविएशन टेक्नॉलॉजी, 10) प्रा. बी. जी. देशपांडे गोल्ड मेडल - तायरोन मिरंडा, एम.एस्सी (जिओलॉजी), पहिला क्रमांक, एप्रिल-मे 2016 परीक्षा, 11) अशोका सुवर्णपदक - झोहराझबीन शेख, बीएस्सी बीएड (इंटिग्रेटेड), पहिला क्रमांक, एप्रिल-मे 2016 परीक्षा.