Wed, Feb 20, 2019 03:03होमपेज › Pune › केंद्रीय व्यापारमंत्री सुरेश प्रभू यांचे रामविलास पासवान यांना पत्र

दहा टक्के साखर निर्यात सूचनेचा विचार करावा

Published On: Jun 04 2018 1:30AM | Last Updated: Jun 04 2018 12:10AMपुणे : प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या उसाच्या एफआरपीची देशात सुमारे वीस हजार कोटी कारखान्यांकडून थकीत राहिले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने 10 टक्के साखर निर्यात कारखान्यांना सक्तीची करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रीय व्यापार मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे नुकतीच केली आहे. त्याची दखल घेत केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांना त्यांनी पत्र पाठवून या मागण्यांवर विचार करण्यात यावा, असे कळविले आहे.

देशात साखरेचे भाव पडल्यामुळे शेतकर्‍यांच्या उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपीची रक्कम देण्यास कारखान्यांकडून असमर्थता दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची अडकून पडलेली रक्कम तत्काळ देण्यासाठी केंद्राने तत्काळ उपाययोजनांची मागणी खा. शेट्टी यांनी प्रभू यांच्याकडे केली होती. साखरेचे भाव गेल्या आठवडाभरात क्विंटलला पाचशे ते सहाशे रुपयांनी वाढलेले आहेत. याचा लाभ घेत कारखान्यांनी टप्प्याटप्प्याने साखर विक्री करून शेतकर्‍यांच्या थकीत एफआरपीची रक्कम देण्याची मागणीही खा. शेट्टी यांनी केली आहे.