Wed, Jan 16, 2019 10:15होमपेज › Pune › एकाची जन्मठेपेची शिक्षा दहा वर्षांवर

एकाची जन्मठेपेची शिक्षा दहा वर्षांवर

Published On: Jan 20 2018 1:41AM | Last Updated: Jan 20 2018 1:05AMपुणे : प्रतिनिधी 

गंभीर मारहाण करून एकाचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्याची जन्मठेपेची शिक्षा कमी होऊन त्याला सदोष मनुष्यवध प्रकरणी दोषी धरण्यात आले असून ही शिक्षा दहा वषार्र्ंवर आली आहे. 

शक्‍तिसिंग दीपकसिंग दुधानी (रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) असे शिक्षा कमी करण्यात आलेल्याचे नाव आहे. 12 जुलै 2011 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अमोल सुनील कांबळे याला गंभीर मारहाण केली होती. उपचाराच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल होऊन याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

याप्रकरणी शक्‍तीसिंगने उच्च न्यायालयात अ‍ॅड. देबज्योती तालुकदार यांच्यामार्फत अर्ज केला होता. उच्च न्यायालयाने खूनाच्या कलमातून दिलासा देताना शक्‍तीसिंगला सदोष मनुष्यवधप्रकरणी दोशी धरून दहा वर्षाची शिक्षा सुनावली. बी. आर. गवई आणि बी. पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे.