Sat, Apr 20, 2019 18:16होमपेज › Pune › दहा जणांना 9 लाखांचा गंडा

दहा जणांना 9 लाखांचा गंडा

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 16 2018 1:17AMपिंपरी : प्रतिनिधी 

सभासद झाल्यास कंपनीमार्फत परदेशात दौरा आणि येणार्‍या खर्चात 50 टक्क्यांची सूट देण्याचे आमिष दाखवून दहा जणांना नऊ लाख रुपयांना फसवल्याचे रहाटणी येथे घडले. हा प्रकार नोव्हेंबर 2017 ते फेब्रुवारी 2018 दरम्यान रहाटणी येथे घडला.

याप्रकरणी महेश बळीराम हळंदे (36, रा. चिखली) यांनी फिर्याद दिली.  तर संकेत शेखर गोपाळे, विजय शिवाजी कांबळे या कंपनी चालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. , गुन्हा दाखल असलेले प्रिस्टीजा सर्व्हिसेस प्रा. लि. ही कंपनी चालवितात. कंपनीकडून सभासदांना देश-विदेशात पर्यटनासाठी पाठविण्याचे तसेच तिकडे थ्री व फोर स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात येईल. त्यामध्ये सभासदांना तब्बल 50 टकक्यांची सवलत मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले. त्यासाठी कंपनीत सुरुवातीला पैसे गुंतवणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार पिंपरी-चिंचवड परिसरात दहा नागरिकांनी आठ लाख 60 हजार 500 रुपयांची गुंतवणूक केली. ठरलेल्या कालावधीत सभासदांना कोणत्याही प्रकारे देश-विदेशात पर्यटनासाठी पाठविण्यात आले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कंपनी चालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.