Thu, Jun 27, 2019 09:37होमपेज › Pune › प्रभात रस्त्यावर दहा लाखांची चोरी

प्रभात रस्त्यावर दहा लाखांची चोरी

Published On: Mar 18 2018 1:06AM | Last Updated: Mar 18 2018 12:33AMपुणे : प्रतिनिधी

डेक्कन परिसरातील प्रभात रस्त्यावर सोसायटीतील बंद फ्लॅट फोडून साडेदहा लाखांचे दागिने चोरट्यांनी पळविल्याची घटना शनिवारी सकाळी उघड झाली. या प्रकरणी गौरव वसंत मोरे (33, प्रभात रोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मोरे हे व्यावसायिक असून, त्यांचा प्रभात रस्त्यावर लेन नंबर 6 मध्ये शिव रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये दुसर्‍या मजल्यावर फ्लॅट आहे. मोरे कुटुंब गेल्या दोन वषार्र्ंपासून याच लेनमधील स्वानंद अपार्टमेंट येथे राहण्यास आहेत. शुक्रवारी मध्यरात्री तीन चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच, घरातील सोन्याचे हिरे, दागिने; तसेच चांदीच्या वस्तू असा एकूण 10 लाख 42 हजार रुपयांचा माल लंपास केला.

 

Tags : pune, pune news, crime, prabhat road, theft,