Fri, Feb 22, 2019 16:04होमपेज › Pune › डॉ. चंदनवाले यांच्या बदलीला तात्पुरती स्थगिती

डॉ. चंदनवाले यांच्या बदलीला तात्पुरती स्थगिती

Published On: Jun 12 2018 1:46AM | Last Updated: Jun 12 2018 1:05AMपुणे : प्रतिनिधी

वैद्यकीय शिक्षण विभागाने नुकतेच एक परिपत्रक काढून ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या कार्यमुक्‍तीचे आदेश पुढील आदेश येईपर्यंत स्थगित केले आहेत. त्यामुळे डॉ. चंदनवाले यांच्या बदलीला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे.

डॉ. चंदनवाले यांची बदली वैद्यकिय शिक्षण आणि संशोधन विभागाने मुंबईतील जे. जे. रुग्णालय येथे पाच जून रोजी केली होती. तसेच दुसर्‍या दिवशी 6 जून रोजी त्यांच्या कार्यमुक्‍तीचे आदेशही काढण्यात आले होते. डॉ. चंदनवाले यांनी बदली झाल्यानंतर येथील 3 कोटी रुपयांच्या ‘सीएसआर’ निधी मिळविण्यासाठी काही दिवसांची मुदत मागितली होती. त्यांची ही मागणी वैद्यकिय शिक्षण विभाग (डीएमईआर) ने मंजुरही केली होती. दरम्यान, डॉ. चंदनवाले यांची बदलीस ससूनमधील सर्व घटकांनी जोरदार विरोध केला.

तसेच सह्यांची मोहिमही राबविली. त्याचबरोबर दैनिक ‘पुढारी’ने बदलीविरोधातील डॉक्टर, विद्यार्थी, जनता, राजकीय पक्ष यांची नाराजी परखडपणे मांडली. त्यामुळे, वैद्यकिय शिक्षण विभागावर दबाव तयार झाला होता.

दरम्यान, डीएमईआर चे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी नुकतेच एक परिपत्रक जारी केले असून, त्यामध्ये डॉ. चंदनवाले यांच्या कार्यमुक्‍तीचे आदेश पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. यामुळे डॉ. चंदनवाले यांची बदली रदद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.