होमपेज › Pune › पुणे : रद्दी घेऊन जाणारा टेम्पो जळून खाक 

पुणे : रद्दी घेऊन जाणारा टेम्पो जळून खाक 

Published On: May 26 2018 12:06PM | Last Updated: May 26 2018 12:06PMवाकड : येथील वाकड येथील युरो स्कूलजवळ रद्दी घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अचानक आग लागली.यामध्ये टेम्पो जळून खाक झाला आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार युरो स्कुलजवळ टेम्पोला आग लागली. रहाटणी आणि संत तुकारामनगर येथील अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी टेम्पोतील रद्दी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तब्बल अर्ध्या  तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र तोपर्यंत टेम्पो जळून खाक झाला होता.

आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.