Fri, Jul 19, 2019 20:04होमपेज › Pune › शिक्रापुरात शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार

शिक्रापुरात शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार

Published On: May 25 2018 1:10AM | Last Updated: May 25 2018 1:04AMशिक्रापूर : वार्ताहर

राहिलेला अभ्यास पूर्ण करवून घेण्याच्या बहाण्याने एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर वर्गशिक्षकाने वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार गुरुवारी उघड झाला. या प्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून, शिक्रापूर पोलिस ठाण्यात विद्याधाम प्रशालेत नोकरीस असलेल्या गणिताच्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तो मूळचा मुढाळे (ता. बारामती) येथील आहे. 9 मे रोजी या शिक्षकाने पीडितेस दुसर्‍या एका शिक्षकाच्या खोलीवर नेले. खोलीमालक शिक्षक तेथून गेल्यावर आरोपीने पीडितेशी अश्‍लील कृत्य करीत फोटो काढले. नंतर बलात्कार करून त्याबद्दल वाच्यता केल्यास फोटो सर्वांना दाखविण्याची धमकी दिली. 11 मे रोजी पुन्हा त्याने बलात्कार केला.