Tue, Sep 25, 2018 05:21होमपेज › Pune › पुणे : ताथवडेत मध्यरात्री तलवारींचा नंगा नाच 

पुणे : ताथवडेत मध्यरात्री तलवारींचा नंगा नाच 

Published On: Apr 24 2018 6:00PM | Last Updated: Apr 24 2018 6:00PMवाकड : वार्ताहर 

वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ताथवडे येथे मध्यरात्री एकच्या सुमारास दहा ते बारा जणांच्या टोळक्याने धुडगूस घातला. हातात नंग्या तलवारी नाचवत रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या तेरा वाहनांची तोडफोड केली.

या प्रकरणी सुनील एकनाथ दिसले ( ४२,रा.ताथवडे) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरून सराईत गुन्हेगार महेश पवार यांच्यासह वैभव उर्फ कांच्या, अक्षय पवार, दत्तात्रय बल्लाळ, यश देवकाते, विष्णू बिराजदार, विष्णू वाघोले यांच्यासह अन्य पाच जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील दिसले यांनी नेहमीप्रमाणे रस्त्याच्या बाजूला बस पार्क केली होती. मध्यरात्री एकच्या सुमारास महेश पवार आपल्या साथीदारांसह तिथे आला. त्यांच्या हातात तलवार, दांडकी, लोखंडी रॉड अशी हत्यारे होती. त्यांनी मोठमोठ्याने गोंधळ करीत रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली. 

सराईत गन्हेगार महेश उर्फ महया पवार नुकताच कारागृहातून बाहेर आला आहे. परिसरात दहशत पासरवण्यासाठी त्यानेच आपल्या साथीदारांसह धुडगूस घातल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी तोडफोड प्रकरणी सहाजणांना ताब्यात घेतले आहे.