Mon, Aug 19, 2019 07:25होमपेज › Pune › टाटा मोटर्स -‘बीएचयू आयआयटी’ मध्ये  सामंजस्य करार

टाटा मोटर्स -‘बीएचयू आयआयटी’ मध्ये  सामंजस्य करार

Published On: Dec 09 2017 1:45AM | Last Updated: Dec 09 2017 12:05AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी  

टाटा मोटर्स आणि आयआयटी (बीएचयू वाराणसी) यांच्यामध्ये शिक्षण आणि संशोधन याबाबत एका सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या. हा सामंजस्य करार प्रामुख्याने शिक्षण आणि संशोधन नवनवीन उपक्रमांबाबत परिचय करून देण्याबाबत आहे. ह्या करारानुसार तंत्रज्ञानाबाबत सहयोग ह्यावर भर देत दोन्ही संस्था परस्पर हितसंबंधित क्षेत्रात काम करणार आहेत. तसेच यामध्ये उद्योग आणि शैक्षणिक संस्थांच्या भविष्यातील अभियांत्रिकी गरजांची पूर्तता करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

सदर सामंजस्य करार हा पाच वर्षे कालावधीसाठी करण्यात आला असून यामध्ये संयुक्तरित्या संशोधन प्रकल्प आणि नवनवीन तंत्रज्ञानात सुधारणा या कार्यक्षेत्रासाठी काम करण्यात येणार आहे. सदर सामंजस्य करारावर टाटा मोटर्स लि. च्या वतीने चीफ ह्युमन रिसोर्स ऑफिसर्स गजेंद्र चंडेल आणि आय आय टी (बीएचयु) चे संचालक प्रोफेसर राजीव सांगल ह्यांच्या उपस्थितीत सह्या करण्यात आल्या.

टाटा मोटर्स लि. च्या वतीने बोलताना गजेंद्र चंडेल म्हणाले की, वाहन उद्योग निरंतर विकसित होत आहे. त्या दिशेने झपाट्याने बदलत असताना डिजिटल विश्‍लेषणाच्या दिशेने, एआय, एआर, व्हीआर इत्यादी म्हणजेच जोडलेले वाहन आणि ‘ड्रॉयव्हर’रहित वाहने प्रत्यक्षात आणणे ही आपल्यासमोरील आव्हाने आहेत. अशा प्रकारच्या तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने होत असलेले बदल आणि बाजारपेठेतील परिस्थिती पाहता आपण एक जागतिक दर्जाचे, सक्षम, प्रतिभावान आणि अभिनव असे मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी प्रयत्न  करायला हवा. 

हा सामंजस्य करार औद्योगिक सज्जता तयार करण्यासाठी शैक्षणिक उत्कृष्टता आणि व्यवसायाबद्दलची माहिती ह्या मध्ये असणारी दरी कमी करण्यासाठी मदत करेल. हा करार सरकारच्या मेक इन इंडिया, स्किल इंडिया आणि स्टार्ट अप इंडिया ह्या कार्यक्रमांतर्गत भारतीय उद्योगधंद्यांना एका जागतिक व्यासपीठावर स्पर्धा करण्यासाठी प्रोत्साहन देईल, असेही त्यांनी सांगितले. 

प्रोफेसर राजीव सांगल म्हणाले की, आम्ही टाटा मोटर्सच्या  भागीदारीत या विशिष्ट सहकार्य कार्यक्रमात भाग घेण्याच्या दिशेने कार्य करणार आहोत. ह्या भागीदारीमुळे टाटा मोटर्सच्या भविष्यातील उत्पादनांसह विद्यार्थ्यांना प्रगत प्रशिक्षणाचे धडे मिळतील व विशिष्ट क्षेत्रांमध्ये संयुक्त संशोधन सक्षम होईल. सध्याच्या उद्योग पद्धतींना आणि उद्योगाच्या भविष्यातील वाढीचा नकाशा यांच्यामुळे विद्याशाखा आणि विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल.