Sat, Nov 17, 2018 23:09होमपेज › Pune › विभागात टँकरची सत्‍तरी

विभागात टँकरची सत्‍तरी

Published On: Jun 22 2018 2:05AM | Last Updated: Jun 22 2018 12:38AMपुणे : प्रतिनिधी  

पुणे विभागात पाणीटंचाईच्या झळा कायम आहेत. विभागातील 77 गावे 344 वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी 70 टँकर सुरू आहेत.पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई वाढली असून, दहा तालुक्यांतील 29 गावे 205 वाड्यांमधील 57 हजार 257 लोकांना 31 टँकरने पिण्याचे पाणी देण्यात येत आहे. सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील पाच गावे आणि एक वाडी-वस्तीवरील सुमारे 6800 लोकांना पाणीटंचाईच्या झळा बसत असल्याने पाणीपुरवठ्यासाठी तीन टँकर सुरू असल्याची माहिती विभागीय आयुक्‍त कार्यालयाकडून देण्यात आली. 

सातारा जिल्ह्यात विभागातील सर्वाधिक पाणीटंचाई आहे. नऊ तालुक्यांतील 43 गावे 126 वाड्यांमधील सुमारे 46 हजार लोकसंख्या आणि 10 हजार जनावरांना पाणीपुरवठा करण्यासाठी 36 टँकर सुरू आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यात दोन वाड्यांमध्ये टंचाई जाणवत असल्याने दोन जलस्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठ्यासाठी   72 विहिरी, बोअरवेल जलस्रोतांचे अधिग्रहण करण्यात आल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाने सांगितले.