Fri, Nov 16, 2018 06:37होमपेज › Pune › तळेगाव न. प.कडून सॅनिटरी नॅपकिन मशिन

तळेगाव न. प.कडून सॅनिटरी नॅपकिन मशिन

Published On: Jan 08 2018 1:15AM | Last Updated: Jan 07 2018 11:22PM

बुकमार्क करा
तळेगाव दाभाडे : वार्ताहर 

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून महिला बालकल्याण समितीच्या वतीने विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशिन बसविण्यात आले. तिचे उदघाटन महिला बालकल्याण समितीच्या सभापती निता काळोखे यांनी केले.  

नगरपरिषद शिक्षण मंडळ शाळा क्र 5 येथे हे मशिन बसविण्यात आले आहे. कार्यक्रमप्रसंगी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपसभापती कल्पना भोपळे, शोभा भेगडे, काजल गटे, वैशाली दाभाडे महिला बालकल्याण पर्यवेक्षिका रसिका लामखेडे, क्षितीज बराटे, अमोल पाटील, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थिनींनी स्वच्छतेचे अनुकरण करावे. या उद्देशाने ही मशिन बसविली आहे. राज्यातील नगरपरिषदेच्या माध्यमातून राबविलेला हा  पहिला उपक्रम आहे. यावेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, सभापती काळोखे व विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन सुरेखा जाधव यांनी केले. आभार शोभा भेगडे यांनी केले.