Sat, Nov 17, 2018 20:37होमपेज › Pune › पैसे घेऊन सर्परुपी सोमेश्‍वराचे दर्शन !

पैसे घेऊन सर्परुपी सोमेश्‍वराचे दर्शन !

Published On: Feb 15 2018 1:57AM | Last Updated: Feb 15 2018 1:41AMसोमेश्वरनगर : वार्ताहर

करंजे(ता.बारामती) येथील प्रसिध्द सोमेश्वर मंदिरात मंगळवारी(दि.13) महाशिवरात्रीनिमित्त आलेल्या भाविकांकडून पैसे घेऊन सर्परुपी सोमेश्वराचे दर्शन दिले जात असल्याचा व्हिडीओ एका जागरुक भाविकाने व्हायरल केल्यानंतर सोमेश्वरनगर परीसरात बुधवारी(दि.14) एकच खळबळ उडाली.

बारामती तालुक्यातील प्रसिध्द देवस्थान असलेले सोमयाचे करंजे राज्यात प्रति सोरटी सोमनाथ म्हणून प्रसिध्द आहे. महाशिवरात्रीनिमित्त याठिकाणी राज्याच्या विविध भागातून लाखो भाविक दर्शनासाठी आले होते.येथे सर्परुपी सोमेश्वराने दर्शन दिल्यानंतर त्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.परंतु देवस्थानचे विश्वस्त बाळासाहेब आत्माराम भांडवलकर हे भाविकांकडून पैसे घेऊन सोमेश्वराचे दर्शन देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.

विश्वस्त मंडळाने बुधवारी सकाळी तातडीने बैठक घेऊन बाळासाहेब भांडवलकर यांच्याकडून याबाबतचा खुलासा मागितला. तो खुलासा धर्मादाय आयुक्तांकडे पाठवून देण्यात येणार असून त्यानंतर संबंधित विश्वस्तावर कारवाई करण्यात येईल असे देवस्थान ट्रस्टकडून सांगण्यात आले.