Sun, May 26, 2019 09:11होमपेज › Pune › वाहन बेशिस्तीने चालवाल तर लायसन्सला मुकाल

वाहन बेशिस्तीने चालवाल तर लायसन्सला मुकाल

Published On: May 27 2018 1:21AM | Last Updated: May 27 2018 12:17AMपुणे : नवनाथ शिंदे

शहरातील बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक विभागाने कंबर कसली आहे. वाहतूक विभागाने रस्ता सुरक्षा सप्‍ताहाच्या 15 दिवसांमध्ये तब्बल 9 हजार 750 बेशिस्त वाहनचालकांची  लायसन्स  निलंबित करण्यासाठी आरटीओकडे प्रस्ताव पाठविले आहेत. वाहन चालविताना मोबाइवर बोलणे, लेन क्रॉस करणे, मद्यपान करून वाहन चालविणे, सिटबेल्ट न लावणे, ओव्हरलोड वाहतूक करणार्‍या चालकांच्या वाहन परवान्यावर निलंबनाची टाच आणली.

दि.24 एप्रिल ते 7 मेच्या कालावधीत आरटीओ व वाहतूक विभागाच्या वतीने  मोबाइल फोनवर बोलणार्‍या तब्बल 5 हजार 625 वाहनचालकांवर कारवाई केली. तर क्षमतेपेक्षा अधिक ओव्हरलोड वाहतूक करणार्‍या 287 जणांवर कारवाई करून त्यांचा वाहन परवाना निलंबित करण्यासाठी आरटीओकडे प्रस्ताव पाठविण्यात आला  आहे. तर अवैध प्रवासी वाहतूक करणारे143 वाहनचालक, मद्यपान  करून वाहन चालविणारे 567, सिटबेल्ट न लावता वाहन चालविणार्‍या 2 हजार 880 वाहनचालकांवर कारवाई केली. अवघ्या 15 दिवसांत वाहतूक विभागाने 9 हजार 750 जणांचे लायसन्स निलंबनच्या कारवाईसाठी प्रस्ताव पाठवले आहेत. वाहन चालकांच्या लायसन्स सस्पेंडचा कालावधी 15 दिवस ते  तीन महिन्यांचा असतो. 

वाहनचालकांना निलंबित वाहन परवाना पुन्हा देण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडून वाहन चालविण्याची टेस्ट घेतली जाते. टेस्टमध्ये चालक पास झाल्यानंतर निलंबित वाहन परवान्यावरील कलम कमी केले जाते. त्यानंतर संबंधित चालकाकडून दंडात्मक रक्कम स्वीकारून वाहन परवाना दिला जातो.