Sat, Feb 23, 2019 19:04होमपेज › Pune › संभाजी भिडेंवर कारवाई करा

संभाजी भिडेंवर कारवाई करा

Published On: Jul 13 2018 12:50AM | Last Updated: Jul 12 2018 11:46PMसांगली : प्रतिनिधी

संविधानाचा आणि  संतांचा अपमान करणारे संभाजी भिडेगुरूजी यांच्यावर तातडीने  कडक कारवाई करा, अशी मागणी सांगली जिल्हा लोकशाही संवर्धन समितीने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. 
समितीचे डॉ. संजय पाटील, श्रीरंग पाटील, गौतमीपुत्र कांबळे, डॉ. अमर पांडे, महादेव पाटील, विकास मगदूम, डॉ. लक्ष्मण शिंदे, धनाजी गुरव आदींनी हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांना दिले आहे. 

निवेदनात म्हटले आहे,  संत ज्ञानदेव, तुकाराम यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता, असे विकृत विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे वारकर्‍यांची मने दुखवणार्‍या भिडे गुरूजींना यापुढे कोणत्याही पालखी सोहळ्यात प्रवेश देऊ नये. त्यांनी वारकर्‍यांची मने दुखावली आहेत. यातून भावना भडकल्यामुळे काहीही होऊ शकते. राज्यात अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे भिडे गुरूजी यांच्यावर तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी.