Tue, Apr 23, 2019 09:38होमपेज › Pune › ‘टीईटी’ परीक्षा होणार जुलै महिन्यात

‘टीईटी’ परीक्षा होणार जुलै महिन्यात

Published On: Apr 13 2018 1:19AM | Last Updated: Apr 13 2018 1:19AMपुणे : प्रतिनिधी 

शालेय शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अर्थात टिईटी परीक्षा येत्या जुलै महिन्यात घेण्याचा राज्य परीक्षा परीषदेचा मानस आहे. त्यामुळे ही परीक्षा घेण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती राज्य परीक्षा परीषदेतील सूत्रांनी दिली आहे. 

राज्य शासनाने शिक्षक होण्यासाठी टीईटी उत्तीर्णतेची अट घातली आहे. तसेच डी.एड शिक्षकांना अभियोग्यता आणि बुध्दीमापन चाचणी ही परीक्षा देण्यासाठी देखील टीईटी उत्तीर्ण असणे अनिवार्यच आहे. तसेच केंद्र सरकारच्या देखील शिक्षण हक्क कायद्यात (आरटीई) मध्ये इयत्ता 1 ते 5 वी व इ.6 वी ते 8 साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व मााध्यम, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे आनिवार्य असल्याचे नुमद करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकाच्या नोकरीसाठी टीईटी उत्तीर्ण होण्याशीवाय पर्याय नसल्याचे दिसून येत आहे.

सन 2013 रोजी पहिल्यांदा टीईटी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर 2014 व 2016 रोजी ही परीक्षा झाली. त्यानंतर 22 जूलै 2017 रोजी परीक्षा घेण्यात आली. आता ही परीक्षा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साधारण 8 जुलै 2018 रोजी घेण्याच्या दृष्टीने संभाव्य वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.