Thu, Apr 25, 2019 23:52होमपेज › Pune › ‘स्वाइन फ्लू’चा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला

‘स्वाइन फ्लू’चा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला

Published On: May 29 2018 1:35AM | Last Updated: May 29 2018 12:00AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात स्वाइन फ्लूचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालू आहेत. नवीन रुग्ण आढळल्यामुळे स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या यावर्षी तीन वर पोचली आहे. तर 29 संशयितांना टॅमी फ्लूच्या गोळ्या  दिल्या आहेत. नवीन रुग्ण आढळल्यामुळे महापालिकेचा वैद्यकीय विभाग सतर्क झाला आहे. 

स्वाईन फ्ल्यू संसर्गजन्य आजार आहे. थंडीमध्ये पोषक वातावरण असल्यामुळे स्वाईन फ्ल्यूची वाढ होत आहे. गेल्या दोन वर्षात स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांच्या संख्येत घट असल्याचे दिसते; मात्र ऐन उन्हाळ्यातही स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. सोमवारी पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. संशयित रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्या दिल्या जातात. सोमवारी एकूण 29 रुग्णांना या गोळ्यांचे वाटप  केले.

तर आणखी एकाच्या घशातील द्रव प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला आहे. थंडी, ताप व खोकला आला असल्याने त्यांच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठवले आहे.  या वर्षी एका रुग्णाचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात आले.