Fri, Apr 26, 2019 20:18होमपेज › Pune › एक लाख १३ हजार नागरिकांना ‘स्वाइन फलू’ची लस

एक लाख १३ हजार नागरिकांना ‘स्वाइन फलू’ची लस

Published On: Jun 25 2018 1:52AM | Last Updated: Jun 25 2018 12:07AMपुणे : प्रतिनिधी

राज्याच्या आरोग्य विभागाकडून जानेवारीपासून आतापर्यंत एकुण एक लाख 13 हजार नागरिकांना स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे विभाग आघाडीवर असून एकुण 48 हजार नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. यापैकी गर्भवतींना सर्वाधिक लसीकरण करण्यात आले असून त्यापाठोपाठ रक्तदाब, मधुमेहींसारख्या अतिजोखमीच्या नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. 

रक्तदाब, मधुमेही, गर्भवती, तसेच ज्येष्ठ नागरिकांना या विषाणूचा संसर्गाचा धोका जास्त असतो. अशा व्यक्तींना अतिजोखमीच्या व्यक्ती म्हणून संबोधले गेले आहे. यासाठी राज्याच्या आरोग्य खात्याकडून मोफत लसीकरण करण्यात येते. गेल्यावर्षी स्वाइन फ्लू ने राज्यात 777 रुग्णांचा बळी घेतला होता. हवेद्वारे पसरणारा स्वाइन फ्लू ला जर आटोक्यात आणायचे असेल तर त्याला लसीकरण हाच एक पर्याय उपलब्ध आहे, म्हणून यावर्षी आरोग्य विभागाने सव्वा लाख लसींची खरेदी केली आहे. 

त्यानुसार खबरदारीचा उपाय म्हणून संसर्ग न होण्यासाठी आरोग्य खात्यातर्फे स्वाइन फ्लूच्या लसींचे मोफत लसीकरण करण्यात येत आहे. राज्यातील अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी सव्वालाख लसी जून महिन्यापूर्वी खरेदी करण्यात आल्या होत्या. त्याचा वापर गेल्या काही महिन्यांपासून सुरु असून या लसी आता संपत आल्या आहेत. जून पूर्वी खरेदी केल्याने त्याचा नागरिकांना उपयोग झाला आहे. 

जानेवारीपासून आतापर्यंत पुणे विभागात 48 हजार 933 जणांना लसीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये गर्भवतींना सर्वाधिक 78 हजार 894 तर रक्तदाब, मधुमेही या 20 हजार 533 जणांना लसीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात 49 हजार 445 जणांना लसीकरण करण्यात आले आहे. तर सरकारी दवाखान्यातील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी अशा 14 हजार 35 जणांना लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य रोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.