Fri, Jul 19, 2019 13:27होमपेज › Pune › स्वाइन फ्लूचे पुन्हा 2 पॉझिटिव्ह रुग्ण

स्वाइन फ्लूचे पुन्हा 2 पॉझिटिव्ह रुग्ण

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 22 2018 10:53PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी (दि. 22) पुन्हा स्वाइन फ्लूचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. नव्याने रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णांची संख्या 24 झाली आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागालाही या आजाराचे रुग्ण थांबविण्यात अपयश येत आहे, त्यामुळे रुग्ण संख्या वाढतच चालल्याचे दिसते आहे. मंगळवारी (दि. 21) स्वाइन फ्लूने काळेवाडी येथील एका 43 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता.  

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसाकाठी दोन रुग्ण आढळत आहेत, त्यामुळे नागरिकांनीही त्याचा धसका घेतला आहे. बुधवारी नव्याने पुन्हा दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने पिंपरी-चिंचवड शहरात यंदाच्या वर्षी या आजाराचे 24 रुग्ण आढळले आहेत. उपचार घेत असताना यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 

स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्यांचे वाटप केले जाते. यंदाच्या वर्षी अद्यापपर्यंत 3 हजार 777 जणांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत, तर एकूण 99 जणांच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. स्वाइन फ्लूची लागण झालेल्या तीन रुग्णांना व्हेटिंलेटवर ठेवण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली.