Sun, Sep 23, 2018 23:40होमपेज › Pune › स्वारगेट-कात्रज मेट्रोला मान्यता 

स्वारगेट-कात्रज मेट्रोला मान्यता 

Published On: Dec 25 2017 1:19AM | Last Updated: Dec 25 2017 12:14AM

बुकमार्क करा

धनकवडी : वार्ताहर

वनाज ते रामवाडी व पिंपरी ते स्वारगेट व्हाया शिवाजीनगर या दोन मेट्रो मार्गाबरोबरच स्वारगेट ते कात्रज मेट्रोस मंजुरी देवुन काम सुरु करावे या आमदार भीमराव तापकीर यांच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदिल दिला असुन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे शहर व उपनगरातील वाढती लोकसंख्या समाविष्ट होणारी हद्दीलगतची गावे पुणे-सातारा रस्त्यावरील फसलेला बीआरटी रस्ता, वाहनांची वाढती वाहतुक व त्यामुळे होणारी नित्याची वाहतुक कोंडी यामुळे वाहनचालकासह स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या पार्श्‍वभुमीवर आमदार भिमराव तापकीर  सुरुवातीपासुन पाठपुरावा करत आहेत.

पुणे शहरातील वनाज ते रामवाडी व पिंपरी ते स्वारगेट व्हाया शिवाजीनगर या दोन्ही मार्गावरील मेट्रो कामास मंजुरी मिळाली असुन काम सुरु झाले आहे.या दोन्ही कामाबरोबरच स्वारगेट ते कात्रज मेट्रोस मंजुरी देवुन काम सुरु करावे अशी मागणी शहराच्या दक्षिण भागातील नागरिकांकडुन करण्यात आली होती.